भाजप कार्यालयात अजित पवार

0
128

शिरुर लोकसभेत शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या उमेदवारीला अजित पवार राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा असलेला विरोध अजित पवार यांनी बुधवारी (ता.20) खेडचा दौरा करून दूर केला. यावेळी त्यांनी आपल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि विद्ममान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याचे त्यांनी दिलेले चॅलेंज पूर्ण करण्यासाठी ते कायपण करण्याच्या तयारीत असल्याचे दिसले.

अमोल कोल्हेंचा पराभव करून आपले उमेदवार आढळरावांच्या विजयासाठी काहीही करायची कसर ते बाकी ठेवणार नसल्याचे या दौऱ्यात दिसले. कारण त्यात त्यांनी महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर प्रथमच भाजप (BJP) कार्यालयाला भेट दिली. भाजपचे जिल्हाध्यक्ष (मावळ) शरद बुट्टे-पाटील यांच्या भाम,खेड येथील जिल्हा कार्यालयाला त्यांनी ती दिली.

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील,आमदार मोहिते आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यावेळी त्यांच्याबरोबर होते. बुट्टे आणि मोहिते यांचेही सख्य आढळराव आणि मोहितेंसारखेच आहे.यानिमित्ताने मोहितेही आपल्या नेत्यांसारखे (अजितदादा) प्रथमच बुट्टेंच्या म्हणजे भाजपच्या कार्यालयात आले. शिरूरमधून आपला खासदार निवडून आणण्यासाठी अजितदादांनी खास मोहीम आखली आहे. त्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तयार होऊन त्यांनी उमेदवाराचे जोमाने काम करावे यासाठी ते वातावरण तयार करत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी भाजप कार्यालयाला आज ही अचानक भेट दिली. त्यांचे स्वागत बुट्टे,भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ ,खेड तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, महिला अध्यक्ष कल्पना गवारी, राजगुरुनगरचे माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, आळंदीच्या माजी नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी केले.

यावेळी त्यांनी बुट्टे यांच्याकडून पक्षाने शिरुर लोकसभा मतदारसंघात तयार केलेली बूथ रचना, बूथचे व्हाट्सअप ग्रुप, शक्ती केंद्र, लाभार्थी संपर्क, गाव चलो अभियान या सर्व उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या जिल्हा आणि तालुका पातळीवरील विविध पदाधिकाऱ्यांचा परिचय करून घेऊन मोकळेपणाने सर्वांना फोटोसाठी वेळ दिला. सर्वांनी एकत्र येऊन नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहणारे खासदार दिल्लीत पाठवू या असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.