भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी कसली कंबर, शरद पवारांची बैठक

0
859

नवी दिल्ली, दि.१ (पीसीबी) – २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला आणि तेलुगु देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची आज दिल्ली बैठक झाली. या बैठकीत तिन्ही नेत्यांनी पुढील रणनितीवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 

सर्वांनी मिळून देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे. लोकशाही वाचवणे हा आमच्या आजच्या बैठकीचा उद्देश होता. चंद्राबाबू नायडू यांनी हा प्रस्ताव मांडला, असे शरद पवारांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले. तर फारूक अब्दुल्ला यांनी सीबीआयमधील गृहकलहाचा मुद्दा उपस्थित केला. देश एका मोठ्या संकटातून जातोय. लोकशाही धोक्यात आली आहे. यामुळे आम्ही आज एकत्र आलोय. विरोधी पक्षांनी एकजूट दाखवल्यास लोकशाही आणि प्रमुख संस्थांना वाचवता येईल. तसेच एक समायिक कार्यक्रम बनवण्यावरही आम्ही चर्चा केली, अशी माहिती फारूक अब्दुल्ला यांनी दिली.