भाजपच्या ‘या’ आमदारांची तिकीट कापली जाणार ?  

0
983

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून काही विद्यमान आमदारांची तिकीटे कापली जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

यावेळी तिकीट कापली जाणार असलेल्या आमदारांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. या बैठकीत राष्ट्रीय संयंसेवक संघाने काही जागांवरील सुचवलेल्या बदलावर चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. तिकीट कापली जाणार असल्याने  भाजपच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

भाजपच्या ‘या’ आमदारांची तिकीट कापली जाणार ?

१) राजकुमार बडोले- अर्जुनी मोरगाव

२) दिलीप कांबळे- पुणे छावणी

३) विलासराव जगताप- जत

४) शिवाजी कर्डीले- राहुरी

५) भारती लवेकर- वर्सोवा

६)  कॅप्टन तामिळ सिल्वन – सायन कोळीवाडा

७)  मंदा म्हात्रे – बेलापूर

८)  संजय केळकर – ठाणे शहर

९ ) विष्णू सावरा- विक्रमगड

१० ) संगीता ठोबरे – केज

११)  अनिल गोटे- धुळे शहर

१२) देव्यांनी फरांदे- नाशिक

१३) प्रकाश मेहता – घाटकोपर पूर्व

१४)  राम कदम – घाटकोपर पश्चिम

१५) सरदार तारासिंग -मुलुंड

१६) विद्या ठाकूर – गोरेगाव

१७)  डॉ.मिलिंद माने- नागपूर उत्तर

१८) गोवर्धन शर्मा- अकोला पश्चिम

१९) अमरीश आत्राम- अहिरे

२०) चरण वाघमारे- तुमसर