ईडी कार्यालयात जाण्याचा शरद पवारांनी इव्हेंट केला – चंद्रकांत पाटील

0
453

पुणे, दि. २७ (पीसीबी) – मुंबईतील ईडी कार्यालयात जाण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इव्हेंट केला, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवार) पुण्यात पत्रकार परिषदेत केली.

शरद पवार यांच्यावर आकसाने कारवाई केली म्हणून निदर्शने करता मग छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, तेव्हा कुठे होते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते? असा सवाल पाटील यांनी यावेळी केला. चार जणांनी जाऊन भाजपच्या कार्यालयाला काळे फासायचे याने काय होणार आहे, असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, शरद पवार ईडीच्या कार्यालयात आज  हजर होणार होते. मात्र, मुंबईत आणि राज्यात  कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे  पोलिस आयुक्तांच्या विनंतीला मान देऊन पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय मागे घेतला. यावरून चंद्रकांत पाटील यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला.