बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर

0
620

मुंबई, दि.२ (पीसीबी) – बेस्ट कर्मचाऱ्यांना पाच हजार ५०० रूपयांचा दिवाळीचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. एकूण ४० हजार कर्मचाऱ्यांना या दिवाळी बोनसचा लाभ होणार आहे. दिवाळी तोंडावर आली असतानाच बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनसपासून दूर ठेवण्यात येऊ नये, अशी मागणी काही दिवसांपासून सुरू होती.

कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याच्या संदर्भात बेस्टचे महाव्यवस्थापक आणि पालिका आयुक्त यांच्यात वाटाघाटी सुरु होत्या. या वाटाघाटी नंतर अखेर आज बोनस जाहीर करण्यात आला. मागील काही महिन्यापासून बेस्टची आर्थिक स्थिती ढासळली होती. यामुळे बोनस मिळणार की नाही याबाबत संभ्रम होता. मागील वर्षी बोनस दिल्यानंतर पगारातून वळता करून घेण्यात आला होता. मात्र, आज बेस्ट कर्मचाऱ्यांना ५,५०० रूपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे.