वाकड पोलिसांचा प्रताप; मयत इसमावर दाखल केला गुन्हा

0
1679

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – वाकड पोलिस ठाण्यात महिला अत्याचाराच्या गुन्ह्याखाली वाकड पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या सासरकडच्या मंडळींविरोधा गुन्हा दाखल केला. मात्र तक्रारदार महिलेचे सासरे यांचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. तरी सुध्दा वाकड पोलिसांनी त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे.

रमेश वाघमारे असे मयत सासऱ्याचे नाव आहे.

याप्रकारामुळे वाकड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तसेच कार्यपध्दतीवर प्रश्न चिन्हे उपस्थित होऊ लागले आहे. या प्रकाराबाबत पोलिसांचे म्हणने आहे कि, सासरे जीवंत असताना त्यांनी त्यांच्या सुनेला त्रास दिला होता. यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता मृत व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन वाकड पोलिस त्यांची चौकशी कशा पध्दतीने करणार हा अट्टाहासाचा विषय झाला आहे.