बुलडाण्यात भीषण अपघात; १३ जणांचा जागीच मृत्यू

0
523

बुलडाणा, दि. २० (पीसीबी) – भरधाव कंटेनर आणि टाटा मॅजिकचा जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १३ जण ठार झाले. ही धक्कादायक घटना आज (सोमवार) दुपारी तीनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर नजीक घडली.

मुकुंद ढगे (वय ४०, रा. अनुराबाद), छाया गजानन खडसे (वय ३७, रा.अनुराबाद), अशोक लहु फिरके (वय ५५, रा.अनुराबाद), नथ्थु वामन चौधरी (वय ४५, रा.अनुराबाद), आरती, रेखा, सोयीबाई छगन शिवरकर (वय २९, रा.नागझरी बहाणपूर), विरेन ब्रिजलाल मिळवतकर (वय ७, रा.नागझरी बहाणपूर), सतीष छागन शिवरकर (वय ३), मीनाबाई बिलोरकर, किसन सुखदेव बोराडे (रा.अनुराबाद), प्रकाश भारंबे (रा.जामनेर रोड भुसावळ), मेघा प्रकाश भारंबे असे १३ जण जागीच ठार, तर गोकुल भालचंद्र भिलवसकर (वय ३०, रा.नागझरी जि.बहाणपूर), छगन राजू शिवरकर (वय २६, रा.नागझरी जि.बहाणपूर) हे जखमी झाले.

या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रस्त्याच्यामध्ये असलेली अपघाती वाहने बाजूला करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.