‘हा’ एक्झिट पोल म्हणतो, भाजपला सत्ता मिळणार नाही   

0
658

मुंबई, दि. २० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले. त्यानंतर विविध वृत्तवाहिनी आणि संस्थांनी प्रसिध्द केलेल्या एक्झिट पोलमधून भाजपला सत्ता मिळण्याचे संकेत मिळत आहेत. तर  ‘न्यूज एक्स आणि नेता’च्या एक्झिट पोलनुसार भाजपला सत्ता मिळणार नाही, असा धक्कादायक अंदाज समोर आला आहे. 

विविध एक्झिट पोलनी भाजपला बहुमत मिळेल, असे अंदाज व्यक्त केले असताना ‘न्यूज एक्स आणि नेता च्या एक्झिट पोलनी  भाजप बहुमतापासून दूर राहिल, असा अंदाज वर्तविला आहे. भाजपला २४२,  काँग्रेसला १६५ तर  इतर पक्षांना १३६ जागा मिळू शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

दरम्यान, टाईम्स नाऊ- ३०६, न्यूज२४ने – ३५०, न्यूज नेशन २८२-२९०  या  पोलनी  भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असे अंदाज व्यक्त केले आहेत.  तर एक्झिट पोलचे अंदाज किती विश्वसनीय आणि खात्रीशीर आहेत, हे २३ मेरोजी निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.