धक्कादायक: तरुणाशी मैत्री केल्याच्या रागातून आईने केला मुलीचा खून

0
400

उत्तर प्रदेश, दि. २० (पीसीबी) – तरुणाशी मैत्री केल्याच्या रागातून आईने पोटच्या मुलीच्या डोक्यात काठीने वार करुन खून केला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात घडली.

याप्रकरणी पीडित तरुणीची आई, दोघे भाऊ, काका आणि गाव प्रमुखाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी तरुणीची हत्या करण्यात आली होती. पण पोलिसांना १४ मे रोजी याची माहिती मिळाली. झाडीत कपड्यांचे काही तुकडे मिळाल्याची माहिती शेजारील गावातील एका गावकऱ्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी शोध घेतला असता तरुणीचा मृतदेह सापडला. ‘स्थानिकाने पोलिसांना शेजारील गावातील काही जणांना आपण या परिसरात पाहिल्याचे सांगितले. यानंतर पोलीस पीडित तरुणीचा फोटो घेऊन शेजारील गावात पोहोचले. यावेळी गावकऱ्यांनी तिची ओळख पटवली. तसेच मुलीच्या आईची कसून चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली. तर अटक केलेल्या पाचही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्या तीन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.