‘बार्सिलोना-पीएसजी’ चॅंपियन्सच्या उप-उपांत्यपूर्व फेरीतच आमने सामने

0
364
स्वित्झर्लंड, दि.१५ (पीसीबी) : बार्सिलोना एफसी आणि पॅरिस सेंट हे दोन मातब्बर संघ यंदा चॅंपियन्स लीगच्या उप उपांत्यपूर्व फेरीतच आमने सामने येणार आहेत.

यंदाच्या चॅंपियन्स लीगचा ड्रॉ आभासी पद्धतीने काढण्यात आला. गत विजेता बायर्न म्युनिच संघ इटलीच्या लाझिओशी खेळणार आहे. स्टार लियोनेल मेस्सी विरुद्ध नेमार म्हणजेच बार्सिलोना विरुद्ध पीएसजी ही लढत म्हणजे २०१७ च्या स्पर्धेची आठवण करून देणारी ठरेल. त्या वर्षी हे दोन्ही संघ याच फेरीत आमने सामने आले होते. त्या वेळी पीएसजीने घरच्या लढतीत बार्सिलोनाचा ४-० असा पराभव केला होता. नंतर बार्सिलोनाने आपल्या घरच्या मैदानावर स्पेनमध्ये सगळी कसर भरून काढताना पीएसजीचा ६-१ असा पराभव करून बाजी मारली होती.

यंदाच्या ड्रॉ विषयी बोलताना बार्सिलोनाचे संचालक गुलिर्मो अॅमर म्हणाले,’आम्ही पीएसजीचा खेळ चांगला ओळखून आहोत. त्यांच्याकडे काही स्टार खेळाडू आहेत.. गतवर्षी ते उपविजेते आहेत हे आम्ही विसरणार नाही. या वेळी त्यांना सुरवातीलाच आम्ही तगडा प्रतिकार करू’

गतविजेत्या बायर्न म्युनिकला तुलनेने सोपा ड्रॉ पडला आहे. लाझिओ विरुद्धची त्यांनाच संभाव्य विजेते म्हणून सर्वाधिक पसंती मिळत आहे. अर्थात, लाझिओला कमी लेखून चालणार नाही. त्यांनी २० वर्षात प्रथमच चॅंपियन्सच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. इटलीच्या संघाविरुद्ध खेळणे नेहमीच कठिण असते. लाझिओ संघा देखिल तसास धोकादायक आहे. त्यांच्याविषयी अंदाज बांधणे कठिण आहे, असे बायर्नचे संचालाक हसन सालिहमिदझिच यांनी सांगितले.

दोन टप्प्यात हेणारी ही उप-उपांत्यपूर्व फेरीची लढत १६ फेब्रुवारीपासून सुरू होईल. प्रिमियर लीगचे विजेते लिव्हरपूल आपली लढत जर्मनीच्या आरबी लिपझिंगशी खेळतील. विशेष म्हणजे युरोपियन स्पर्धेत लिव्हरपूल गेल्या दहा सामन्यात जर्मनीच्या संघाविरद्ध अपराजित आहे. तेरा वेळा युरोपियन चॅंपियन्स राहिलेला रेयाल माद्रिद संघा इटलीच्या अॅटलांटाशी खेळेल. अॅटलांटाने गेल्यावर्षी प्रथमच या स्पर्धेची बाद फेरी गाठली होती. अर्थात, आतापर्यंतच्या ११ लढतीत माद्रिदने अॅटलांटाविरुद्ध विजय मिळविला आहे.