हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि अभिनेता संजय दत्त यांच्या पहिल्या भेटीचा हा किस्सा तुम्हाला माहित आहे का??

0
729

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि बॉलीवूड अभिनेते संजय दत्त यांचा एकमेकांशी काय संबंध आहे… हे अजूनही काही जणांना माहित नाही. 

अभिनेते संजय दत्त यांनी त्यांच्या आई नर्गिस याच्या तोंडून बाळासाहेब ठाकरेंच नाव ऐकलं होत.पण संजय दत्त यांची बाळासाहेब ठाकरेंशी प्रत्यक्ष भेट आणि ओळख झाली ती ‘मुंबई बॉम्बस्फोट’ प्रकरणानंतर.

त्यावेळी सुनील दत्त हे संजय दत्त यांचे नाव बॉम्बस्फोट प्रकरणात असल्यामुळे सारखे काळजीत होते. ते संजय ना वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत होते. मात्र, सुनील दत्त हे स्वतः काँग्रेसचे वरिष्ठ नेते असूनही दिल्ली कोणताही काँग्रेस नेता या प्रकरणात त्यांना मदत करायला तयार नव्हता. अशा वेळी खचून गेलेले सुनील दत्त मुंबईला परतले.

तेव्हा राजेंद्र कुमार यांनी सुनील दत्त यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भेटण्याचा सल्ला दिला. मात्र हि गोष्ट सुनील दत्त यांना पटली नाही.

मग, त्यावेळी राजेंद्र कुमार यांनी सुनील दत्त यांना हे प्रकरण शांतपणे हाताळण्याची गरज आहे असं सांगितलं. आणि यामध्ये बाळासाहेब ठाकरेच तुम्हाला मदत करू शकतात असा सल्ला दिला आणि याआधी बाळासाहेब ठाकरेंनी कशाप्रकारे अमिताभ बच्चन यांना ‘शहेनशाह’ या चित्रपटावेळी मदत केली हे समजावून सांगितलं. त्यावेळी अभिनेता अमिताभ बच्चन यांचं नाव एका प्रकरणात गोवल गेलं होत. त्यामुळे ‘शहेनशाह’ चित्रपट प्रदर्शनात अडचणी निर्माण होत होत्या म्हणूनच ‘शहेनशाह’ चित्रपटावर बंदीची मागणी येत होती. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली होती. आणि अखेर बाळासाहेब ठाकरेंनी ‘शहेनशाह’ चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा करून दिला होता.

या सर्व गोष्टींवर खूप विचार केल्यानंतर सुनील दत्त यांनी तब्बल ३ दिवसांनी राजेंद्र कुमार यांना बाळासाहेब ठाकरेंना भेटण्याची तयारी दर्शवली. काही दिवसांनी सुनील दत्त आणि संजय दत्त बाळासाहेब ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले. तिथे बाळासाहेब ठाकरे दत्त यांना म्हणाले कि, ‘तुम्हाला मी आवडत नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. पण एकेकाळी मी तुमचा खुप मोठा चाहता होतो.’ बाळासाहेब ठाकरेंचं हे शब्द ऐकून सुनील दत्त यांना गहिवरून आले. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंकडे संजय दत्तला वाचवण्याची विनंती केली.

यावर बाळासाहेबांनी ‘मी प्रयत्न करीन पण फक्त तुमच्यासाठी…संजय साठी नाही.’ असं स्पष्टपणे सांगितलं.

शिवाय त्यांनी संजय यांना कठोर शब्दात सुनावलं आणि ताकीद सुद्धा दिली की, ‘नेहमी वडील सांगतील ते ऐकत जा आणि आपली संगत बदलली कि आपण सुद्धा बदलू शकतो.’ असा सल्ला दिला. तेव्हा पासून संजय दत्त बाळासाहेबांचं वर्णन करताना फक्त ३ शब्दात करतात कि, ‘बाळासाहेब वाघ आहेत’.

एका कार्यक्रम दरम्यान संजय दत्त यांनी बाळासाहेबांसोबतचा एक अनुभव सांगितला कि, ‘त्या प्रकरणानंतर मी मुंबई मध्ये असताना बाळासाहेब मला रोज फोन करून माझी विचारपूस करायचे आणि माझ्या वडिलांना म्हणायचे कि, संज्या ला सांग काळजी नको करू…मी आहे.बाळासाहेब हे राजकीय नेते होते पण त्याही पेक्षा जास्त ते देशप्रेमी होते…त्यांना कोणी आवडलं तर ते त्या व्यक्तीवर खूप प्रेम करायचे अगदी खूप जीव लावायचे. मग तो व्यक्ती चुकीचा आहे का बरोबर आहे हे ते पाहत नव्हते…पण जर का राग आला तर मग सगळंच संपलं…’, असं संजय दत्त आजही सांगतात…

संजय दत्त सांगतात कि, ‘माझी आई पण नेहमी आम्हाला सांगायची कि, बाळासाहेब ठाकरे मला माझ्या भावासारखे आहेत त्यामुळे आयुष्यात काहीही प्रॉब्लेम आला तर बाळासाहेबांकडे जावा..’