बारावीचा शंभर टक्के निकाल

0
213

चिंतामणी राञप्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे यश

चिंचवड, दि. 6 (पीसीबी) : दिवसभर नोकरी करुन आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी चिंतामणी राञप्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातुन मिळत असते.राञ प्रशाळेत आपले अध्यापन करुन बारावी काॅमर्सच्या विद्यार्थी वर्गाने मोठ्या स्वरुपात यश संपादन केले आहे.

यावर्षी प्रथम क्रमांक सविता राठोड (७८%),द्वितीय क्रमांक प्रांजल जाधव(७७.५०%),तृतीय क्रमांक पुष्पा येवले (७०.३३%)गुण संपादन करुन यश संपादन केले.त्यांचे विद्यालयाच्यावतीने कौतुक करण्यात आले.पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विद्यालयात सत्कार करण्यात आला.चिंतामणी राञ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा १००% निकाल लागला.
यावेळी प्राचार्य दिलीप लंके म्हणाले की,”राञशाळा गरीब,होतकरु,परिसरामधील, कामगार वर्गातील विद्यार्थी वर्गासाठी शिक्षकासाठी विशेष प्रयत्न करत आहे.शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना आणुन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी देत आलेली आहे.आमचे विद्यार्थी दिवसभर काम करतात आणि कामकरुन राञप्रशालेत शिक्षण घेतात. शैक्षणिक अनुकुल वातावरण नसुन सुध्दा ते आपला अभ्यास करतात.त्यातुन उत्तम परीक्षेत यश ही संपादन करतात.त्यांचे मी कौतुक करतो.”

याप्रसंगी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली सरीता राठोड म्हणाली की,”या राञप्रशालेत अध्यापन करणारे प्राध्यापक आम्हाला तळमळीने शिकवितात.आमच्या अडचणी समजुन घेऊन मार्गदर्शन करतात.प्राचार्य विद्यार्थी वर्गाच्या अनेक अडचणी सोडवितात.त्यांना अडचणीत मदत ही करतात.त्यामुळे आम्हाला परीक्षेत सहज यश मिळविता येते.मला राञप्रशालेतुन अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करता आले.याचा आनंद होत आहे.”

याप्रसंगी सरस्वती शिक्षण संस्था,पुणे च्या अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव चिटणीस,शालासमिती अध्यक्ष यांनी या यशाबद्दल कौतुक केले आहे. प्राचार्य दिलीप लंके,प्रा.राजेंद्र सोनवणे,प्रा.रुकसाना शेख,प्रा.प्रिया भामरे,प्रा.रामधन कसबे,प्रा.सुधिर चौधरी,शरद वंझारे,मारुती वाघमारे,प्रणिता पोटे,नारायण चव्हाण इ.चा यावेळी विद्यालयाचा वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.प्रिया भामरे यांनी मानले.

चिंतामणी राञप्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय,चिंचवड स्टेशन,पुणे ने गेली चाळीस वर्षांपासुन पिंपरी चिंचवड शहरातील शिक्षणापासुन वंचित हजारों विद्यार्थांना शिक्षणप्रवाहात आणले आहे.