बापरे! शहरात आणखी ‘एवढ्या’ वाहनचोरीच्या घटना उघड

0
296

पिंपरी, दि. 6 (पीसीबी) : चाकण, दिघी, चिखली, तळेगाव एमआयडीसी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चार वाहने चोरून नेली. याबाबत गुरुवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निर्मला सुनिल मुंगसे (वय 38, रा. महाळुंगे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मुंगसे यांची तीस हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 14 / एफ व्ही 9908) त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

रमेशकुमार ताराचंद साहू (वय 35, रा. मोशी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची तीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / जे सी 8328) च-होली फाटा येथील श्याम डेव्हलपर्स ड्रीम्स कार्निवल्स येथे 31 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता पार्क केली. दुपारी अडीच वाजता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

राम एकनाथ हाके (वय 35, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हाके यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 13 / ए व्ही 0073) 29 जुलै रोजी दुपारी एक वाजता ताम्हाणे वस्ती येथील सावतामाळी मंदिरासमोर पार्क केली. सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
नरसिमा नारायण रेड्डी (वय 54, रा. विकासनगर, देहूरोड मूळ रा. आंध्रप्रदेश) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी रेड्डी यांची दहा हजार रुपये किमतीची दुचाकी फिर्यादी त्यांनी चार जुलै रोजी सकाळी नऊ वाजता नवलाख उंब्रे गावच्या हद्दीत एल एल अँड टी कंपनीच्या मोकळ्या पार्किंगमध्ये पार्क केली. दुपारी तीन वाजता ते कंपनीतून बाहेर आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.