बापरे! बायोडिझेलची डिलरशिप देण्याच्या बहाण्याने झाली ‘एवढ्या’ लाखांची फसवणूक; तब्बल अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

0
270

चाकण, दि.१४ (पीसीबी) – बायोडिझेलची डिलरशिप देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची नऊ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी 11 जणांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी येथे घडला.

सचिन साहबेराव लबाडे, हरीश बोरकर, बालाजी बोरे, संतोष वर्मा अलुरी, जयंत जगन्नाथ केसरकर, शाहनवाज उर्फ शहाबाज खान, सतीश बुरले, किशोर गायकवाड, पराग कामत, दीपक पादी यांच्यासह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत साहेबराव खंडू दौंडकर (वय 56, रा. वडमुखवाडी, च-होली. मूळ रा. दौंडकरवाडी शेलपिंपळगाव, ता. खेड) यांनी याबाबत बुधवारी (दि. 13) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून MY OWN ECO ENERGY PVT LTD कंपनीचे इंडिझेल नावाच्या बायोडिझेलची डिलरशिप देण्याचे दौंडकर यांना खोटे आश्वासन दिले. त्यापोटी आरोपींनी दौंडकर यांच्याकडून वेळोवेळी चेकद्वारे नऊ लाख तीन हजार रुपये घेतले. पॅसीए घेऊन दौंडकर यांना दिलशिप न देता त्यांची फसवणूक केली. याबाबत त्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.