बापरे! निगडित आणि भोसरीत तब्बल एवढ्या ‘अनधिकृत बांधकामा’ बाबत गुन्ह्यांची नोंद

0
200

भोसरी, दि.११ (पीसीबी) – पालिकेच्या परवानगीशिवाय बांधकाम केल्याबाबत निगडी पोलीस ठाण्यात दोन तर भोसरी पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सोहेल नूर मोहम्मद पठाण, दामजी हिरजी चौहाण, विजय सुराम चौधरी (सर्व रा. आकुर्डी) यांच्या विरोधात एक तर उज्वला हनुमंत चव्हाण (रा. गुरुदेव नगर, आकुर्डी) यांच्या विरोधात एक असे दोन गुन्हे निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

अरिफ गद्दुभाई तांबोळी (वय ५०, रा. कासारवाडी), पार्वती सिद्धराम देगलमडी (वय ४५, रा. बॉ-हाडेवाडी, मोशी), राधा मारोती सोनटक्के (वय ४०, रा. धावडेवस्ती, भोसरी), भीमाशंकर परमेश्वर कामटकर (वय ३८, रा. धावडेवस्ती, भोसरी) सोपं बाबाजी क्षीरसागर (वय ५५), अशोक सोपान क्षीरसागर (वय ३४, रा. पसायदान कॉलनी, भोसरी), नथुराम बाबाजी काजुळकर (वय ४६, रा. सावंतनगर, भोसरी), बबन बाजीराव टेमगिरे (वय ३८, रा. सिद्धिविनायक कॉलनी, भोसरी) यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आरोपींनी अनधिकृतपणे बांधकाम केले. त्याबाबत महापालिकेने त्यांना नोटीस बजावली. त्या नोटिशीनुसार आरोपींनी त्यांचे अनधिकृत बांधकाम काढून घेणे बंधनकारक होते. मात्र, आरोपींनी त्याची अंमलबजावणी केली नाही. याबाबत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.