दुकानासमोरून तब्बल ‘एवढ्या’ लाखाचे कॉपर वायर, पितळ धातूचे तुकडे चोरीला

0
284

मोशी, दि.११ (पीसीबी) – दुकानासमोर ठेवलेले कॉपर वॉकर आणि पितळ धातूचे तुकडे असा एकूण एक लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना मोशी बोराटेवाडी येथे अरिहंत एंटरप्रायजेस येथे घडली.

शंकरलाल मगनलालजी जैन (वय ७०, रा. स्पाईन रोड, चिखली) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी बोराटेवाडी येथे फिर्यादी जैन यांचे अरिहंत एंटरप्रायजेस हे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या दुकानाच्या कंपाउंडमध्ये ठेवलेले ९० हजारांची कॉपर वायर आणि ३० हजारांचे २५ किलो पितळ धातूचे तुकडे असा एकूण एक लाख २० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.