पिंपरी-चिंचवड शहरातून सहा दुचाकी चोरीला

0
237

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराच्या एमआयडीसी, चाकण, सांगवी, चिखली आणि वाकड परिसरातून सहा दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. १०) अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अनिल देवराम शिंदे (वय ४३, रा. गायकवाड वस्ती, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे यांची १० हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली आहे.

चाकण पोलीस ठाण्यात अतुल विनायक मोहिते (वय ३२, रा. मोहितेवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची पाच हजारांची दुचाकी चोरट्यांनी त्यांच्या घराजवळून चोरून नेली आहे.
सांगवी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. त्यात पहिली घटना पिंपळे निलख येथील साई क्रिस्टल येथे घडली. तर दुसरी घटना ममता नगर, जुनी सांगवी येथे घडली. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी ४० हजारांच्या दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत.

चिखली पोलीस ठाण्यात नरेंद्र रमाकांत राऊत (वय ३०, रा. गणेश हाऊसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) यांनी फिर्याद दिली. त्यांची २० हजारांची दुचाकी चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमांडून चोरून नेली आहे.
वाकड पोलीस ठाण्यात देरावसिंग शिवदानसिंग राठोड (वय ४२, रा. काळेवाडी फाटा, वाकड) यांनी दुचाकी चोरीबाबत फिर्याद दिली. राठोड यांची २० हजारांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली आहे.