बाणेर येथे साडेपाच किलो गांजा जप्त

0
507

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – विक्रीसाठी आणलेला १ लाख ११ हजार २६० रुपये किमतीचा ५ किलो ५९५ ग्रॅम वजनी गांजा जप्त करुन दोन जणांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई शनिवार (दि.२) दुपारी तीनच्या सुमारास बाणेर मोहनगर येथील कुमार प्रॉपर्टी मैदानाजवळ करण्यात आली.

पोपट प्रभाकर चोरघे (वय ४९, रा. हायक्लास रेसिडेन्सी, सर्वे नं. ३४४, फ्लॅट नं.३००, बावधन, पाषाण) आणि जाफर अफजल पठाण (वय २३, रा. जिजाऊ चौक, म्हाळुंगे, ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. या दोघांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती कि, काही लोक बाणेर मोहनगर येथे गांजा विक्री करण्यासाठी येणार आहेत. यावर  अंमली पदार्थ विरोधी पथकाने परिसरात सापळा रचून पोपट आणि जाफर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन पिशव्या होत्या. यामध्ये १ लाख ११ हजार २६० रुपये किमतीचा ५ किलो ५९५ ग्रॅम वजनी गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करुन दोघांनाही अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे अधिक तपास करत आहेत.