बस दरीत कोसळून दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू

0
1613

नवसारी, दि. २३ (पीसीबी) – गुजरातमध्ये सापुताऱ्याजवळील बर्डीपाडा-महाल रस्त्यावर शनिवारी दुपारी शालेय विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दहा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर २० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास सुरत येथील खासगी क्लासमधील ८० विद्यार्थी घेऊन चाललेली बस (क्र.जीटी/५/झेड/९९९३) सहलीसाठी सापुतारा येथे आली होती. सहलीहून परतताना डांग व कळवण तालुक्यांच्या सीमेलगत असलेल्या महाल या गावाजवळील बर्डीपाडा येथील वळणावरील दुधाला गावाजवळ ब्रेक निकामी झाल्याने बस तीनशे फूट दरीत कोसळली. या अपघातात दहा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर, २० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी सूरतमधील अमरोली येथील आहेत. विद्यार्थ्यांबरोबर खासगी क्‍लासचे शिक्षकही होते.