खमक्या नेतृत्वाअभावी पुण्यातील विकासकामांना गती नाही – खासदार संजय काकडे

0
902

पुणे, दि. २३ (पीसीबी) –  व्यावसायिक व्यक्तीला प्रोफेशनलपणे काम करण्याची व कमिटमेंट पाळण्याची सवय असल्याने ती  व्यक्ती राजकारणात आली तर, जुमलेबाजी न करता प्रोफेशनली काम करण्यावर भर देते. सध्या पुणे महापालिकेत सावळा गोंधळ सुरु आहे. खमक्या नेतृत्वाअभावी  कामांचे नियोजन होत नाही. त्यामुळे पुण्यातील विकासकामांना अपेक्षित गती मिळत नाही, अशी टीका खासदार संजय काकडे यांनी केली.

काकडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी विधानसभा मतदारसंघात संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आज (रविवार) वडगावशेरी मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी ते बोलत होते. काकडे यांनी वडगावशेरी मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या . यावेळी त्यांनी नगररोड कट्ट्यावर मान्यवरांशी विविध विषयांवर चर्चा केली.

पुण्याच्या विकासासाठी लोकसभा निवडणूक लढविणार आहे. निवडून आल्यानंतर मी जनतेला उत्तरदायी असेल. खासदार झाल्यानंतर एका वर्षात पुण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे. मध्यवर्ती पेठांसह सर्व उपनगरांना मिळणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून पुरेसा पाणीपुरवठा  करणे शक्य आहे.  केवळ  त्यासाठी नियोजन करुन निर्णय घेण्याची गरज आहे, असे खासदार काकडे म्हणाले.