बसवर दरड कोसळली, तब्बल 40 हून अधिक भाविक मलब्याखाली अडकले; एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल

0
341

किन्नोर, दि.११ (पीसीबी) : हिमाचल प्रदेशमधील किन्नौर भागात बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली.किन्नौर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली असून या दरडीच्यामलब्याखाली भाविकांनी भरलेली बस अडकली आहे. हिंदुस्थानी लष्कर व एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू आहे.

ही बस किन्नौर वरून शिमला येथे जात होती. या बससोबत दोन कार देखील या दरडीखाली अडकल्याचे समजते. दुर्घटनाग्रस्त बस ही हिमाचल रोड वेजची असून यातील सर्व प्रवासी हे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून परत येत असताना हा अपघात झाला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.