चाकण पोलिसांची दमदार कामगिरी: काही तासातच पोलिसांनी हल्लेखोर आरोपीला केलं जेरबंद

0
481

चाकण, दि.११ (पीसीबी) : पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील वाकी खुर्द भाम नदीच्या पुलाजवळ इथं सागर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या रागातून हॉटेल मालक आणि त्याच्या साथीदाराने एका तरुणावर तलवारीने वार करून ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण जवळील वाकी खुर्द तालुका खेड येथील भामा नदीच्या पुलावर घडला आहे. हेमंत संतोष सुतार वय वर्ष20 (रा.लादवड ता.खेड) असे तलावरीने केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे आणि सुरज विठ्ठल वाळुंज (वय 28 रा.ठाकुर पिंपरी ता.खेड) असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हेमंत सुतार आणि सुरज वाळुंज या दोघांनी हॉटेल सागर याठिकाणी हॉटेलच्या व्यवस्थापकास आणि स्वयंपाकीला मारहाण केली होती.

याच रागातून हॉटेल मालक ऋत्विक वहिले व त्याच्या साथीदाराने चारचाकी मोटारीनी दोघांचा पाठलाग केला. त्यानंतर दुचाकीस धडक देऊन एकावर तलवारीने हल्ला करून त्यास ठार केले. तर दुसऱ्याच्या अंगावर चारचाकी मोटार घालून त्याला गंभीर जखमी केलं.

जखमी झालेल्या सुरज वाळुंज याच्या फिर्यादीवरून वाकी खुर्द येथील हॉटेल सागरचा मालक ऋत्विक अतुल वहिले वय वर्षे 22 (रा सुबरेंनगर वाकी खुर्द, ता. खेड) यांच्यासह त्याचा साथीदार मयूर बाळासाहेब येवले वय 20 (रा. सुबरेंनगर,वाकी खुर्द ता. खेड) यांच्यावर मंगळवार 10 ऑगस्ट रोजी चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून गुन्हे पोलीस निरीक्षक अनिल देवडे, पोलीस शिपाई उद्धव गर्जे यांच्या सह चाकण पोलिसांनी आपल्या तपासाची तात्काळ सूत्रे फिरवत मोठ्या शिफारीतीने आरोपी पळून जायच्या तयारी असताना तात्काळ चाकण पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळत जेरबंद केले पुढील तपास चाकण पोलीस करत आहे.