चिंचवडकरांची चिखली-आंबेवाडी गावात पूरग्रस्तांना मदत

0
344

कोल्हापूर, दि. 11 (पीसीबी) – भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी पूरग्रस्त बांधवांसाठी मदत संकलन अभियान सुरू केले होते व चिंचवडकर नागरिकांनी मदत करावी याकरिता आवाहन केले होते. या आवाहनास चिंचवडगावातील आदर्श मंडळ श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ ‘चिंचवडचा राजा’ या मंडळाने सर्वप्रथम प्रतिसाद देत किमान १०० नागरिकांच्या परिवारास आवश्यक अशी स्वयंपाकाच्या भांड्याचे किट दिले. चिंचवडगावातील नामांकित शिक्षण संस्था श्री मोरया शिक्षण संस्था (माटे शाळा) यांनी देखिल २०० कुटुंबांसाठी आवश्यक अशी मोठ्या प्रमाणात सामग्री दिली.

या मदत संकलन अभियानासाठी चिंचवडकर नागरिकांनी देखिल उदंड प्रतिसाद देत पूरग्रस्तांसाठी मदत केली होती. आज कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भयंकर झळ बसलेल्या ‘चिखली-आंबेवाडी’ गावातील सुमारे ५०० पूरग्रस्त कुटुंबांना ही मदत वाटण्यात आली याकरिता सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील (कोल्हापूर) यांचे विशेष सहकार्य लाभले.

या पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळावी याकरिता नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे मित्र परिवार, श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष महेश मिरजकर, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीचे शहर अध्यक्ष धनंजय शाळिग्राम, भाजपा मंडल सरचिटणीस नंदूकाका भोगले, अजिंक्य राऊत, सुखदेव खिल्लारी, अतुल कांबळे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.