बलात्कारी आसाराम बापूचा जीवनपट पडद्यावर साकारणार  

0
476

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) –  बलात्कार प्रकरणी दोषी असणाऱ्या आसाराम बापूवर  बायोपिक करण्यात येणार आहे. बॉलिवूड निर्माते सुनील बोहरा हे या बायोपिकची निर्मिती करणार आहेत. पत्रकार उशीनर मजूमदार यांनी लिहीलेल्या ‘गॉड ऑफ सिन : द कल्ट, द क्लाउट एंड डाउनफॉल ऑफ आसाराम बापू’ या पुस्तकावर सुनील बोहरा चित्रपट तयार करणार आहेत.  

उशीनर मजूमदार यांनी   लिहीलेल्या पुस्तकात पी.सी. सोलंकी यांनी पीडित मुलीचा खटला पैसे न घेतला कसा लढविला होता, हे वाचले. पी.सी. सोलंकी यांनी हा खटला जिंकत पीडित मुलीला न्याय मिळवून दिला होता. त्यांच्या या कामामुळे मी प्रचंड प्रभावित झालो आणि त्या क्षणी आसारामवर बायोपिक करण्याचा निर्णय घेतला, असे सुनिल बोहरा यांनी सांगितले.

या खटल्याशी संबंधीत जोधपूर आणि सूरत कारागृहातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनीही मला प्रेरित केले, असे सुनील बोहरा यांनी सांगितले.  दरम्यान, या बायोपिकमधून आसारामच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा होणार आहे. तर आसाराम बापूची भूमिका कोण साकारणार हे अद्याप समजलेले नाही.