फ्लॅट, फ्रीज, टीव्हीची मागणी करत विवाहितेचा छळ…

0
207

मोरवाडी, दि. ३० (पीसीबी) – फ्लॅट, फ्रीज आणि टीव्हीची मागणी करत पती, सासू, सास-यांनी विवाहितेचा छळ केला. ही घटना एप्रिल 2018 ते 10 ऑगस्ट 2021 या कालावधीत बावधन, पुणे व मोरवाडी पिंपरी येथे घडली.

 

पती आरिफ नुरमोहम्मद पठाण, सासरे नुरमोहम्मद महंमद पठाण, सासू जमीलाबी नुरमोहम्मद पठाण (रा. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तुझ्या बापाने हुंडा दिला नाही’ असे म्हणत आरोपींनी फिर्यादीकडे फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये, फ्रीज आणि टीव्ही घेऊन येण्याची मागणी केली. फिर्यादीच्या भावाच्या नावावर असलेला फ्लॅट आरोपींनी त्यांच्या नावावर करून दे म्हणत शिवीगाळ केली. फिर्यादी यांना माहेरी ठेऊन त्यांना नंदवण्यासाठी न नेता त्यांचा छळ केला व जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.