भाजी घेण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा मोबाईल पळवला…

0
207

वाकड, दि. ३० (पीसीबी) – भाजी घेण्यासाठी गेलेल्या वृद्ध व्यक्तीचा 60 हजारांचा मोबाईल फोन अज्ञातांनी चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 28) सायंकाळी कस्पटे वस्ती, वाकड येथे छत्रपती चौकात घडली.

 

किशोर योगीराज जोशी (वय 62, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता कस्पटेवस्ती येथील छत्रपती चौकात भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. भाजी घेत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या खिशातून 60 हजारांचा मोबाईल फोन नकळत चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक मणेर तपास करीत आहेत.