फ्लॅटच्या उघड्या दरवाजावाटे ते आले आणि…

0
209

बावधन, दि. १ (पीसीबी) – फ्लॅटच्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून फ्लॅटमधून एक लॅपटॉप आणि दोन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 31) सकाळी साडेसात ते नऊ वाजताच्या सुमारास बावधन येथे घडली.

देवेंद्र तुकाराम घोरसड (वय 27, रा. बावधन) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घोरसड यांचा फ्लॅट गुरुवारी सकाळी साडेसात ते नऊ वाजताच्या कालावधीत उघडा होता. त्यावेळी अज्ञात चोरटयांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. एक लॅपटॉप आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 40 हजारांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.