घातक हत्यारे बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
283

देहू, दि. १ (पीसीबी) – तलवार, सत्तूर, कु-हाड, गुप्ती अशी घातक हत्यारे बाळगल्या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 31) रात्री साडेआठ वाजता विठ्ठलवाडी, देहूगाव येथे करण्यात आली.

सनिल वसंत गायकवाड (वय 36, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून हत्यारे जप्त करण्यात आली असून त्याला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. पोलीस शिपाई किशोर परदेशी यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने घातक हत्यारे बाळगली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी विठ्ठलवाडी देहूगाव येथील पाण्याच्या टाकीच्या परिसरात सापळा लावून आरोपी गायकवाड याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून एक हजार 600 रुपये किमतीची दोन तलवारी, दोन सत्तूर, एक कु-हाड, एक गुप्ती अशी घातक हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

आरोपी गायकवाड याच्या विरोधात हत्यार कायदा 4 (25), मुंबई पोलीस कायदा कलम 387(1) सह कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहिद पठाण तपास करीत आहेत.