फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी आणि कार घेण्यासाठी विवाहितेकडे पाच लाखांची मागणी

0
255

वाकड, दि. ३ (पीसीबी) – फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी आणि नवीन कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची सासरच्या लोकांनी विवाहितेकडे मागणी केली. त्यासाठी विवाहितेने नकार दिला असता सासरच्या लोकांनी तिचा छळ केला असल्याची फिर्याद विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे.

त्यानुसार सुनील दत्तात्रय खंडागळे (वय 34), दिपक दत्तात्रय खंडागळे (वय 38), आशा दत्तात्रय खंडागळे (वय 60), ज्योती ठोकळे (सर्व रा. कात्रज) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार 12 डिसेंबर 2018 ते 1 मे 2021 या कालावधीत मंगलनगर, वाकड येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटचे कर्ज घेण्यासाठी तसेच कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी आरोपींनी फिर्यादी विवाहितेकडे केली. त्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला. त्यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेला मारहाण, शिवीगाळ करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. 20 डिसेंबर 2020 रोजी सुनील खंडागळे याने हातातील कड्याने डोक्यात मारून विवाहितेला जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.