फुकट योजना कशा राबवायच्या ते भुजबळांकडून शिका – संजय राऊत

0
644

नाशिक,दि.२६(पीसीबी) -शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी “फुकट योजना कशा करायच्या हे छगन भुजबळ यांच्याकडून शिका” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं कौतुक केल आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन याचे उत्तम उदाहरण आहे. शासकीय पैसे खर्च न करता त्यांनी सर्वात चांगली इमारत उभी केली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटले.

भाजपकडून महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात घोटाळा झाला असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत होता. भाजपने तत्कालीन आघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात रान उठवलं होतं. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ व शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, महाविकास आघाडीचे सरकार पुढील ५ वर्षे टिकून राहणार आहे. महाराष्ट्राला देशातील पहिले राज्य करायचं असल्याचंही राऊत यांनी सांगितले.