संजय राऊत यांचा ट्विटवरवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल

0
565

मुंबई,दि.२६(पीसीबी) – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एक नवीन ट्विट केले आहे. हे ट्विट सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणार आहे. त्यांनी पुन्हा एकादा भाजपवर हल्लाबोल केला आहे.

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सातत्यानं ट्विट हल्ले करत आहेत. राऊत पुन्हा एकदा शेर ट्विट कर भाजपाला सुनावलं आहे.

“तूफान में कश्तियां और घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं..” असं ट्विट राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांचा रोख मोदी सरकारवर राहिला आहे. हे ट्विट करत त्यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला इशारा दिला आहे. वादळात होड्या तर गर्वामुळे लोक संपून जातात, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.