फाळके पुरस्काराबद्दल कृतज्ञ हूं मैं- अमिताभ बच्चन

0
346

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार अलीकडेच जाहीर झाला. केंद्रीय माहिती-प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी या पुरस्काराची घोषणा करताच, केवळ चित्रपटच नव्हे, तर देशातील प्रत्येक कलाक्षेत्रातून अमिताभ यांच्यावर आनंद व कौतुकाचा वर्षाव झाला. या सगळ्या शुभेच्छा स्वीकारत बिग बींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

‘ कृतज्ञ हूं मैं , परिपूर्ण , आभार और धन्यवाद … मैं केवल एक विनयपूर्ण , विनम्र अमिताभ बच्चन हूं।’ असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त केली आहे. आत्तापर्यंत पद्मविभूषण, पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार तसेच तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे…