कॉलर माझी आहे. मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन. दुसऱ्यांना काय करायचं?,

0
515

मुंबई, दि.२५ (पीसीबी) – कॉलर उडवणं ही माझी स्टाईल आहे. कॉलर माझी आहे. मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन. दुसऱ्यांना काय करायचं?, असं उदयनराजे भोसलेंनी म्हटलं आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा झाली त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

उदयनराजे त्यांच्या  कॉलर उडवण्याच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या स्टाईलवर अनेकदा टीकाही होते. टीकाकारांना उत्तर देताना त्यांनी माझी कॉलर आहे, मी काहीही करेन दुसऱ्यांना त्याच्याशी काय करायचंय? असा प्रश्न त्यांनी विचारला.

कशावरही चर्चा होते. मुद्द्यांचं राजकारण करु नका, तर समाजकारण करा. लोकं आशिर्वाद देतील, असंही उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीत असतानाही उदयनराजे पक्षाध्यक्ष शरद पवारांसमोर कॉलर उडवताना दिसायचे. भाजप प्रवेशानंतर महाजनादेश यात्रे दरम्यानही त्यांनी कॉलर उडवली होती.