प्रियंका गांधींनी नागपूरमधून लोकसभा लढवावी; राहुल गांधींना पत्र  

0
524

नागपूर, दि. ६ (पीसीबी) –  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी नागपूरमधून  लोकसभा निवडणूक लढवावी, अशी  मागणी करणारे  पत्र नागपूर काँग्रेसचे प्रवक्ते संदेश सिंगलकर यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना लिहिले आहे.

नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु आहे. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे, तर पक्ष कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत आहे.  पक्ष संघटनेत चार वर्षांत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे येथून प्रियांका गांधी रिंगणात उतरल्या, तर त्यांना  समर्थन देण्यासाठी सर्व गट एकत्र येतील, असा विश्वास सिंगलकरांनी व्यक्त केला आहे.

कधीकाळी नागपूर काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता नागपूरमध्ये  पक्ष खिळखिळा झाला आहे. त्यामुळेच मागील निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. अशा परिस्थितीत पुन्हा काँग्रेसला भरारी घेण्यासाठी  प्रियांका गांधी यांनी येथून निवडणूक लढवणे गरजेचे आहे, असे सिंगलकर यांनी पत्रात म्हटले आहे.