रिक्षा अंगावर घालून किवळेत पत्रकाराला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

0
1046

देहूरोड, दि. ६ (पीसीबी) – गरजू व्यक्तीला मदत केल्याच्या रागातून रिक्षा चालकाने पत्रकाराच्या अंगावर रिक्षा घालून फरफटत नेऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.  ही घटना  रविवारी (दि.३) दुपारी बाराच्या सुमारास विकासनगर किवळे येथे घडली.   

संजय जयराम धुतडमल (वय ४३ रा. आंबेडकरनगर, देहूरोड) असे जखमी पत्रकाराचे नांव आहे. त्यांनी सचिन अनंत  यादवळे (रा. दत्तनगर, किवळे) याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार सचिनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय यांनी एका व्यक्तीला मदत केल्याने आरोपी सचिन याच्या मनात राग होता. रविवारी दुपारी संजय विकासनगर येथून दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी त्यांना फोन आला असता ते दुचाकी बाजूला घेऊन फोनवर बोलत होते. त्यावेळी सचिन त्याची रिक्षा घेऊन जात असता संजय फोनवर बोलत असल्याचे त्याला दिसले. त्यानंतर त्यांने रिक्षा संजयच्या अंगावर घातली. तसेच त्याला फरफटत नेले. यात संजयच्या दोन्ही हाताला, गुडघ्याला, तोंडाला मोठी दुखापत झाली. त्याच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

अधिक तपास देहूरोड पोलिस करत आहेत.