प्रिती बारिया हत्या प्रकरणी दोन्ही दोषींना फाशी

0
754

भंडारा, दि.३० (पीसीबी) – भंडाऱ्यातील बहुचर्चित प्रिती बारिया हत्या प्रकरणातील दोषी आमीर शेख आणि सचिन राऊत यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. भंडारा जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश संजय देशमुख यांनी हा निकाल दिला.

एसी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करुन तिघांवर केलेल्या प्राणघातक हल्यात प्रिती बारिया यांचा जागीच मृत्यु झाला होता. तर दोन मुलांना कायमचे अपंगत्व आले. तीन वर्षापुर्वी म्हणजेच ३० जुलै २०१५ रोजी ही घटना घडली होती. दुपारी दोनच्या सुमारास म्हाडा कॅालनीमधील रवींद्र शिंदे यांच्या घरी, त्यांची मुलगी अश्विनी एकटी असल्याचे पाहून, आमीर आणि सचिन एसी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात घुसले. त्यानंतर तिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने हल्ला करुन घरातील दागिने, लॅपटॅाप, एटीएम कार्ड चोरले. या घटनेत अश्विनीला कायमचे अपंगत्व आले होते.

यानंतर आरोपींनी याच दिवशी रात्री आठच्या सुमारास ताकिया वॅार्डातील रुपेश बारिया यांच्या घरीही एसी दुरुस्तीच्या बहाण्याने प्रवेश केला. आरोपींनी रुपेश यांच्या पत्नी प्रिती बारिया यांच्या डोक्यावर हातोडीने वार करुन हत्या केली. यावेळी त्यांचा मुलगा भव्य बारिया समोर आला असता, त्याच्याही डोक्यावर हातोडीने वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. बारिया यांच्या घरातून सोने-चांदीचे दागिने आणि ३ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम चोरली.