बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्याकडून काढून घेतला पदभार

0
441

पुणे, दि. २९ (पीसीबी) – बांधकाम व्यावसायिक डीएसके कर्ज प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता मराठे यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. दिल्लीहून विशेष बैठकीसाठी आलेल्या गुप्ता यांना पुण्यातच थांबण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याचे समजते.

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. या चारही अधिकाऱ्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता रवींद्र मराठे आणि राजेंद्रकुमार गुप्ता यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. आलेख राऊत यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला आहे.