प्रदेशाध्यक्षपदाचा अशोक चव्हाण यांनी दिला राजीनामा

0
816

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आहेत, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

मी आपल्या महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा  राहुल गांधी यांच्याकडे पाठवला आहे. आता पक्षांतर्गत फेरबदलाचा निर्णय राहुल गांधी यांना घ्यायचा  आहे. तसेच यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनाच आहेत. तसेच लवकरात लवकर मी राहुल गांधी यांची यांची भेट घेणार आहे,  असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे.  यापूर्वी उत्तर प्रदेशातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज बब्बर यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तर राहुल गांधी यांच्या अमेठीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.  तर स्वत: राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत.