पोलीस कर्मचाऱ्यांचे ट्रॅक रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात; असमाधानकारक काम करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

0
1399

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस कर्मचाऱ्यांचे ट्रॅक रेकॉर्ड तपासण्याचे आदेश आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिली आहेत. हा आदेश जलद गतीने अमलात आणत पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे ट्रक रेकॉर्ड तपासायला सुरुवात झाली आहे. तसेच या रेकॉर्डमध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी असमाधानकारक काम केले आहे. त्यांची उचलबांगडी करण्यास ही सुरुवात झाली आहे.

आयुक्तांनी बदल्यांच्या बाबतीत पोलीस कर्मचाऱ्यांना फ्री हॅण्ड दिला होता. यामुळे जे मागेल तिथे त्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याची बदली केली जात होती. बदल्यांच्या बाबतीत आयुक्तांचे म्हणने होते कि, कर्मचाऱ्यांच्या सोईनुसार त्यांची बदली केली पाहिजे. ज्यामुळे ते समाधानी राहतील आणि काम व्यवस्थित करतील. मात्र हे फ्री हॅण्ड देणे आयुक्तांना चांगले महागात पडले. ज्याचा प्रत्यय म्हणजे “नाळे प्रकरण”. खरेतर गुन्हे शाखा पोलिस खात्यातील अतिशय महत्वाचे खाते असते. या विभागात उत्तम अधिकारी कर्मचारी असने गरजेचे असते. मात्र बदल्या देताना आयुक्तांनी कर्मचाऱ्यांचे ट्रक रेकॉर्ड न तपासल्याने. त्यांच्यासह आयुक्तालयाला नाळे प्रकरणामुळे चांगलीच बदनामी सहन करावी लागली.

ही चुक सुधरवण्यासाठी आयुक्तांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे ट्रॅक रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली आहे. यामुळे कोण प्रामाणिकपणे काम करत आहे तर कोणी कुठे बस्थान बसवले आहे हे समजणार असून बेलगामांना आळा बसणार आहे. तसेच पुन्हा अशा चुका होणार नाहीत याची विशेष काळजी घेण्यास देखील मदत होणार आहे.

आज आयुक्तांनी परिमंडळ दोनच्या उपायुक्त नम्रता पाटील यांची बदली मुख्यालयात केली तर त्यांच्या जागी मुख्यालयातील उपायुक्त विनायक ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली. सांगवीचे वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे यांची बदली वाहतूक शाखेत केली तर त्यांच्या जागी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. निगडीचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप लोंढे यांची बदली चिंचवड वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी तर लोंढे यांच्या जागी देहूरोडचे निरीक्षक (गुन्हे) अमरनाथ वाघमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगवीचे निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. सांगवी पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक योगेश आव्हाड यांची बदली विशेष शाखेत, सांगवीचे सहायक निरीक्षक खताळ यांची बदली दिघी पोलीस ठाण्यात तर सांगवीचे उपनिरीक्षक महेंद्र आहेर यांची बदली हिंजवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.