पैशातून कोरोना पसरतो का ?

0
619

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) : कोरोनाटा संसर्ग कुठून कसा होईल सांगता येत नाही. हाताचा स्पर्ष कुठे होईल आणि कोरोना नशिबाला येईल त्याचा नेम नाही. अगदी दैनंदिन व्यवहारातसुध्दा हा प्रश्न आहे. पैशा मार्फत कोरोनाचा संसर्ग होतो का? असा प्रश्न कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्रामार्फत विचारला आहे. “अनेक रिपोर्ट्सनुसार नोटांमार्फत संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे हा एक चिंतेचा विषय आहे”, असंदेखील कॅटने पत्रात म्हटलं आहे.

“पैशांची एक नोट अनेकांच्या हातात पडते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. केंद्र सरकारने याबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती किंवा सूचना जारी कराव्यात. नोटांमार्फत खरच कोरोनाचा संसर्ग होणार असेल तर त्यापासून वाचण्यासाठी कशाप्रकारच्या उपायोजना करता येऊ शकतात, याबाबत माहिती द्यावी”, असं कॅटने पत्रात म्हटलं आहे.

“ही माहिती फक्त व्यापाऱ्यांसाठीच महत्त्वाची नाही तर देशभरातील सर्वसामान्य नागरिकांनादेखील या गोष्टीचा फायदा होईल. याशिवाय नोटांमार्फत कोरोनाचा संसर्ग होत असेल तर तो रोखता येईल”, असंदेखील पत्रात म्हटलं आहे.

“पैशांमार्फत किंवा नोटांमार्फत संसर्गजन्य रोग पसरतो, अशी माहिती अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रिपोर्ट्समध्ये दिली गेली आहे. अज्ञात लोकांमध्ये नोटांमार्फत होणारा संसर्ग हा अत्यंत घातक आणि चिंताजनक आहे”, असं कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल म्हणाले आहेत.

दरम्यान, देशात उद्योगधंद्यांना सुरु होण्यासाठी हळूहळू परवानगी दिली जात आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये कारखाने, दुकानं सुरु होत आहेत. मात्र, तरीही सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अजूनही कोरोनाबाबत धाकधूक आहे.

पैशातून कोरोना पसरला तर धोको यांना …
दरम्यान, पैशामार्फत कोरोनाचा संसर्ग होत असेल तर दैनंदिन व्यवहार अडचणीत येणार आहेत. बाजारपेठेतील व्यापारी, छोटे उद्योजक, किराणा, भाजी मंडई, चहा, बेकरी, रेस्टारंटसह सर्वांनाच ही धोक्याची सुचना आहे. सर्वसामान्य, गरिब, रोजंदार कर्मचारी ऑनलाईन पेमेंटच्या फंदात पडत नाही. रोजची मजुरी त्यांना रोखीत मिळते, रोजची खरेदी असते. व्यापारी रोज लाखो रुपये हाताने मोजतात. नोटा खुल्या करताना, मोजताना सवयीप्रमाणे बोटाची थुंकी वापरण्याची सवय असतेच. दारावर हातगाडीवरची भाजी खरेदी असेल तर रोख रक्कम द्यावी लागते. दवाखान्यात गेलात तरी वैद्यकीय सल्ला फी रोखीत मोजावी लागते. शाळा, महाविद्यालयांतून प्रवेशासाठी अनेकदा डोनेशन हे रोखीतच घेतले जाते. आजही चलनात ५० टक्के व्यवहार हे काळ्या पैशातच चालतात. देशात ६५ टक्के ग्रामिण भागात आजही ऑनलाईन व्यवहाराचा तपास नाही, तिथे पैशाचे व्यवहार हे रोखीतच चालतात. कोपऱ्यावरच्या वाण्याकडे किराणा खरेदीसाठी गेलात तर महिन्याचे बिलसुध्दा रोखीत द्यावे लागते. त्यामुळे देशातील ९९ टक्के जनता रोख पैशाचाच वापर करत असते. अशा परिस्थितीत पैशातून कोरोनाचा प्रसार होत असेल तर सर्व जनता अडचणीत येऊ शकते. त्यामुळे राज्यकर्यांसह लोकांमध्येही घबराट आहे. ऑन लाईन व्यवहार हा त्यावरचा एकमेव तोडगा आहे. जुन्या नागरिकांसाठी ती मोठी अडचण आहे. गावखेड्यात इंटरनेट सुविधा, कनेक्टिव्हीटी नसल्याने परिस्थिती कठीण आहे. आता सरकार काय करणार याकडे लोकांचे लक्ष आहे.