दाऊद इब्राहिम याला कोरोनाची बाधा

0
564

मुंबई, दि. 6 (पीसीबी): १९९३ च्या मुंबई बॉबस्फोट प्रकरणात भारताला हवा असणारा मोस्ट वॉंटेड दहशतवादी अंडरवर्ल्ड माफिया दाऊद इब्राहिम याला कोरोना व्हायरस या विषाणूची लागण झाल्याची बातमी आहे. इतकेच नाही तर दाऊदची पत्नी महजबिन हीला सुद्धा कोरोनाने आपली शिकार बनवले आहे.

पाकिस्तानी माध्यमांनी याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. दाऊद इब्राहिम आणि त्यांची पत्नी महजबीन यांना पाकिस्तानच्या कराची येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये म्हटले आहे. मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिमचे वैयक्तिक सुरक्षा कर्मचारी आणि कर्मचारी यांनाही क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांनी १९९३ ला भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट रचला होता. अलीकडेच दाऊदच्या पाकिस्तानमधील दोन ठिकाणांची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय दाऊदला संरक्षण पुरवत असली तरी, पाकीस्तानात दाऊद नसल्याची पाकिस्तान सरकारची अधिकृत भूमिका आहे. पाकिस्तानी मिडीयाच्या या वृत्तामुळे पाकिस्तान सरकारची पोलखोल झाली आहे.

मुंबईतील १३ ठिकाणावर १२ मार्च १९९३ रोजी बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये सुमारे ३५० निर्दोष लोकांचा बळी गेला. यानंतर २००३ साली, भारत सरकारने अमेरिकेकडे पाठपुरावा करुन दाऊद इब्राहिमचा जागतिक दहशतवद्यांच्या यादीत समावेश केला.

दाऊदचा निकटचा मित्र एजाज लकडावाला याच्या चौकशी दरम्यान पाकिस्तानच्या कराचीमध्ये दाऊदच्या दोन ठिकाणच्या पत्त्यांची माहिती पुढे आली होती. मुंबईत गुन्हेगारी साम्राज्य पसरवून नंतर मुंबईत साखळी बॉंम्बस्फोट घडवणारा आयएसआयचा हस्तक नंतर पाकिस्तानच्या आश्रयास गेला असून आयएसआय आणि पाक लष्कराच्या छत्रछायेत राहत आहे.