पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरलेत फक्त २ दिवस; नाहीतर पॅन कार्ड होणार रद्द. ३१ मार्च शेवटची तारीख

0
267

मुंबई, दि.३० (पीसीबी) : जर आपण अद्यापही आपले पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नसेल, तर हा निष्काळजीपणा आपणास महागात पडू शकतो. तुम्हाला केवळ 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार नाही, तर तुमचे पॅन बेकायदेशीरही होईल. आपल्याकडे फक्त 31 मार्च 2021 पर्यंतचा वेळ आहे, त्याआधी पॅन अणि आधार लवकारात लवकर लिंक करा.

लोकसभेत या मंगळवारी मंजूर झालेल्या वित्त विधेयक 2021 च्या नव्या दुरुस्तीचा हा भाग आहे. हे अर्थ विधेयक 2021 मंजूर करताना, सरकारने आयकर कायदा 1961 मध्ये नवीन कलम (कलम 234H) जोडण्यात आले आहे, जे 31 मार्च 2021 पर्यंत पॅनला आधारशी लिंक केले नाहीत, तर तुमच्याकडून दंड आकारला जाईल.

सध्या हा दंड १ हजार रुपयांपेक्षा कमी असला तरी यापेक्षा अधिक दंड असणार नाही. जे लोक पॅनला आधारशी लिंक करणार नाहीत, त्यांच्यावर शासन दंड रक्कम निश्चित करेल. परंतु अडचण अशी असेल की, अशा लोकांचा पॅन ‘inoperative’ असेल म्हणजेच ते कोणत्याही आर्थिक कामासाठी वापरले जाणार नाही, कारण पॅन हे सर्व आर्थिक कामांसाठी अनिवार्य कागदपत्र आहे.

१००० रूपये दंड, ज्या लोकांना कमी वाटत असेल तर अशा लोकांना समजले पाहिजे की, त्यांची बरीच कामे अडकतील. जसं की पॅनला आयकर भरणे आवश्यक आहे, परंतु जर पॅन ‘inoperative’ असेल तर आपण आयकर भरू शकणार नाही व तुमच्याकडून मोठा दंड आकारला जाऊ शकतो. हा दंड 10,000 रुपयांपर्यंत असू शकतो. म्हणजेच 10 हजार रुपयांचा दंड आणि त्यावर 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो.

जर एखाद्या व्यक्तीने कॅन्सल किंवा ‘ inoperative’ पॅनची माहिती दिली तर अशा पॅनकार्डधारकांना फक्त (Non-Pan Holders) पॅन नसलेल समजले जाईल, परंतु त्यांना आयकर कायद्याच्या कलम 272 बी अंतर्गत 10,000 रुपये दंड देखील लागू केला जाऊ शकतो. पॅन ‘ inoperative’ झाल्यास टीडीएसला TDS कापला जाऊ शकतो असे कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आयकर कायद्यांतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पॅनबद्दल माहिती दिली नाही तर त्याला जास्त टीडीएस TDS आणि टीसीएस TCS लावण्यात येईल.