पादचारी रस्ताही नाही सुरक्षित; महिलेसोबत काय घडले पहा….

0
398

वाल्हेकरवाडी, दि. ३० (पीसीबी) – सकाळच्या वेळी रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 64 हजारांचे मिनी गंठन चोरट्याने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 29) सकाळी वाल्हेकरवाडी येथे घडली.

मधू रमेश रनवरे (वय 49, रा. वाल्हेकरवाडी) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाल्हेकरवाडी येथील रजनीगंधा सोसायटी मधील नॅशनल बेकरी अँड जनरल स्टोअर्स या दुकानासमोरून सोमवारी सकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास पायी चालत जात होत्या. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 64 हजार रुपये किमतीचे 16 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठन हिसकावले. चोरट्याने मळलेला काळ्या रंगाचा टीशर्ट घातला होता. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.