पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण

0
363

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना 24 जानेवारी रोजी रात्री पावणे दहा वाजता घडली असून याबाबत 27 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाद्या शिंदे (वय 19), सजनी उर्फ पप्या सावंत (वय 19), नेहाल शेख (वय 19), राहुल कांबळे (वय 19), मुकुल कांबळे (वय 18), मोसिन शेख (वय 19, सर्व रा. दत्तनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पुष्पा चंद्रकांत शिंदे (वय 42, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांचा मुलगा संकेत आणि आरोपी यांचे मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. 24 जानेवारी रोजी फिर्यादी आणि त्यांचा मुलगा संकेत त्यांच्या घरासमोर थांबलेले असताना आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून संकेतला सिमेंटच्या गट्टूने मारले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गटारीत पाडून जखमी केले. आरोपींनी संकेतला शिवीगाळ केली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.