चिंचवड, चाकण, वाकड, हिंजवडी मधून चार दुचाकी चोरीला

0
348

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – चिंचवड, चाकण, वाकड आणि हिंजवडी परिसरातून चार दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत बुधवारी (दि. 27) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सारंग नितीन मटंगे (वय 21, रा. लिंकरोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची एक लाख 10 हजारांची पल्सर दुचाकी (एम एच 14 / जे एफ 7382) अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरून नेली. ही घटना 25 जानेवारी रोजी रात्री साडेआठ ते 26 जानेवारी रोजी सकाळी दहा या कालावधीत घडली.

मंदा सुरेश शिंदे (वय 40, रा. राणूबाई मळा, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 20 हजारांची दुचाकी (एम एच 14 / जी सी 9157) अज्ञात चोरट्यांनी शिंदे यांच्या घरासमोरून चोरून नेली. ही घटना 14 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
व्यंकट सिद्धराम कपनुरे (वय 32, रा. शिंदे नगर, मारुंजी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / डी पी 8930) अज्ञात चोरट्यांनी वाकड येथील अॅपल हॉस्पिटल येथून चोरून नेली. ही घटना 19 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता घडली आहे.
अंकुश राम सूळ (वय 27, रा. मारुंजी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सूळ यांची पाच हजारांची दुचाकी (एम एच 12 / एच आर 0447) अज्ञात चोरट्यांनी 26 जानेवारी रोजी दुपारी अडीच ते साडेतीन या कालावधीत माण येथील समछाया हॉस्पिटल येथून चोरून नेली आहे.