पूर्ववैमनस्यातून तरुणाला दगडाने मारहाण

0
275

देहूरोड, दि. १६ (पीसीबी) – पूर्ववैमनस्यातून एकाने तरुणाला दगडाने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 14) रात्री आंबेडकर नगर, अमरदीप सुपर मार्केटच्या बाजूला, देहूरोड येथे घडली.

शुभम सुब्रमण्यम मारी (वय 21, रा. आंबेडकर नगर, दुर्गामाता मंदिराजवळ, देहूरोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत मंगळवारी (दि. 15) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार्तिक सुनील कुंभार (वय 20, शिवाजीनगर, देहूरोड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम हे अमरदीप सुपर मार्केटच्या बाजूला असलेल्या हातगाडीवर बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने ‘तू माझ्याकडे का बघतोस’, असे म्हणून जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी यांच्या डोक्यात दगडाने मारून दुखापत केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.