तू आमच्या नादी लागू नको, तुला खाल्लास करील; अशी धमकी देत केली मारहाण

0
599

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – माजी महापौर भिकू वाघिरे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमास गेलेल्या एकाला तिघांनी मिळून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 14) रात्री नानेकर वाडा, शिवाजी पुतळा, पिंपरीगाव येथे घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश सुरेश वाघिरे, राजेश सुरेश वाघिरे, सुशिल श्रावण मोहन (सर्व रा. नानेकर वाडा, शिवाजी पुतळा, पिंपरीगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सतीश एकनाथ नाणेकर (वय 50, रा. नानेकर वाडा, शिवाजी पुतळा, पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठ वाजता आरोपी कार मधून फिर्यादी यांच्याकडे आले. ‘तु भिकू वाघिरे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमास का आला होता. भिकाऱ्या तुझी लायकी आहे काय’, असे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करून आरोपी गणेश याने लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर मारून जखमी केले. ‘तू आमच्या नादी लागू नको. तुला खाल्लास करील’, अशी आरोपींनी धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.