पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडून १० लाखांची मदत

0
452

पुणे, दि. २० (पीसीबी) – सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने प्रत्येकी ५ लाख रुपये या प्रमाणे एकूण दहा लाख रूपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे दिली आहे.

यावेळी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील उपस्थित होते.

पूर ओसरला असला तरीही ही दोन्ही शहर आणि या शहरांलगत असलेली गाव हळूहळू सावरत आहेत. पुरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले.  दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मदतीचे आवाहन केले होते. मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या वतीने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्तांसाठी प्रत्येकी रक्कम रुपये ५ लाख रुपये या प्रमाणे एकूण १० लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला.