काँग्रेसची पोलखोल यात्रा निघण्यापूर्वीच गटबाजीत अडकली !

0
304

मुंबई, दि. २० (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या प्रत्युत्तरादाखल नाना पटोले यांची पोलखोल यात्रा निघण्यापूर्वीच अंतर्गत गटबाजीचा विळख्यात अडकली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. नाना पटोले यांच्या पोलखोल यात्रेवरुन काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता यात्रेचे आयोजन केल्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे.

नाना पटोले काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून सध्या काम बघत आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत अदयाप कुठलेही ठोस नियोजन न केल्याने वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती पुढे येत आहे. नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नेतेच नाराज असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान याचा फटका काँग्रेसला बसू शकतो असे काही नेत्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पोलखोल यात्रेवरून पक्षात कुठलेही मतभेद नसल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. तारखांची थोडी जुळवाजुळव सुरु होती, त्यामुळे यात्रेची तारीख पुढे ढकलण्यात आली. काँग्रेस संसदीय समितीच्या बैठकीत या यात्रेबाबत निर्णय झाला आहे. त्यामुळे याबाबत नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही, अस नाना पटोलेंनी स्पष्ट केलं आहे.