पुलाखाली गाडी उभी करणे पडले महागात

0
285

कासारवाडी, दि. ५ (पीसीबी) – नाशिकफाटा उड्डाणपुलाखाली उभी केलेली दुचाकी भरदिवसा अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना 28 जून रोजी उघडकीस आली.

अतुल सोपान घुले (वय 41, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) यांनी रविवारी (दि. 4) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जून रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी घुले यांनी आपली 15 हजार रुपये किंमतीची (एम एच 14 / सी एन 2139) ही दुचाकी नाशिकफाटा येथील मराठा खाणावळ समोरील उड्डाण पुलाखाली उभी केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.